बळीराजा कविता (Baliraja Kavita)
बळीराजा कविता
शेतात राबणारा
दुःखात रोज आहे,
जनतेस लुटणारा
सुखात आज आहे!
मातीत घाम गाळून
तो राबतो सदाही
कष्टास नाही त्याच्या
येथे वाव आज आहे!
रक्तास रोज वाहतो
पाण्यासमान मातीत,
त्याच्याच जीवनाशी
अन्याय होत आहे!
घेतो निरोप जाण्यास
सोडूनी जग सारे,
कर्जात बळीराजा
निराश होत आहे!
कळेल कधी तुम्हाला
खुर्चीत बसणारे,
पोशिंदा तो जगाचा
गळफास घेत आहे!
- रामकृष्ण राठोड (पिंपळवाडी)

Total 0 Comments